Be Frank म्हणजे नेमकं काय असतं हे मला 19 मार्च 2017 रोजी कळलं!
कारण, हे माझं ‘BE FRANK‘ चं पहिलंच session होतं आणि त्यातच Be Frank team member म्हणून थोडी extra जबाबदारी माझ्यावर होती.
खरंतर या be frank च्या आधी करण दादा, आनंद दादा यांसोबत मी एकदम frankly गप्पा cum तयारी केली होती. त्यात आपल्याला काय-काय आणि कशाप्रकारे करता येईल हे ठरवलं होतं. त्यामुळे प्रत्यक्ष Be Frank ची खूप उत्सुकता होती..

2017-03-20-22-26-07पुण्याच्या monthly meeting नन्तर लगेचच be frank ला सुरुवात झाली…
सुरूवातीलाच प्रत्येकाने स्वतःची ओळख करून दिली. पण फक्त साधी सरळ ओळख होईल तो be frank कसला… तर यावेळी ओळख करून देताना आपण करत असलेल्या activities बद्दल थोडक्यात संगायच होतं.. आणि…आणि…आपल्या नावाच्या आद्याक्षरापासून सुरु होणाऱ्या एका activist चे नाव सांगायच होत.
हि ओळख परेड करताना खूप मजा आली.

काहीजणांनी अनेक activist ची नावं पटापट सांगितली तर काहींना एक नाव सांगायलाही चाचपडावं लागत होतं. यातून आम्हाला माहीत नसलेल्या activists ची नावं आणि कामही कळलं. या activist मध्ये भीमराव आंबेडकर, सुधा मूर्ती, प्रकाश आमटे, कैलाश सत्यार्थी आणि डोब्रा वेलीस असे भन्नाट activist होते. यासोबत प्रत्येकानी सांगितलेल्या त्यांच्या स्वतःच्या activities सुद्धा खूप वेगळ्या होत्या. कुणी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता तर कुणी अनाथआश्रमाला भेट दिली होती. खरतर या activity अगदी छोट्या आणि साध्याश्या होत्या. पण……… “होत्या..!”

2017-03-20-22-23-29

यांनंतर आनंद ने एक प्रश्न सगळ्यांना विचारला, तो म्हणजे “खरच activist असण्याची गरज आहे का….?” याची उत्तर खूप वेगवेगळी होती होती. परशुराम च मत होत की, “सगळ्यांनीच Activist होण्याची काय गरज आहे..?” पण बऱ्याच जणांना अस वाटत होत की आपण activist असायला हवं. या चर्चेला अभ्यासपूर्ण वळण दिल ते वैभवदादाने..आणि दीक्षा ताई ने…त्यांनी activist म्हणजे नेमकं काय हे…अगदी साध्या आणि कमी शब्दांत समजवून सांगितलं.

यातली ‘Activist म्हणजे शासनाविरोधात काम करणारी व्यक्ती नव्हे तर, activist म्हणजे नागरिक व शासनातील दुवा होय’ आणि वंचित घटकांना त्यांच्या हक्कांपासून डावलल जात तिथं activist त्यांना त्यांचे हक्क मिळवून देतो..म्हणजेच ‘प्रत्येकाला प्रवाहात आणणं गरजेचं असतं’ ही मतं मला आवडली.

यानंतर दीक्षाताई आणि वैभवदादा ह्या आमच्यातच असलेल्या दोन activistsनी आमच्याशी संवाद साधला. दीक्षाताईचा एक activist म्हणून झालेला प्रवास तिच्याकडूनच ऐकणं ही आमच्यासाठी एक पर्वणीच होती.दीक्षाताईकडून आम्हाला महत्वाची गोष्ट कळली ती अशी की- ‘आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध स्वतःची बाजू मांडणं हीसुद्धा एक activity च आहे’.दीक्षाताईने तीला आलेल्या negativity पासून ते इतर समस्यांवर स्वतःच उपाय कशाप्रकारे शोधून काढले हे ऐकणाऱ्याला थक्क करणारं होतं.आपल्या स्वतःच्याच समस्यांना गोंजारत न बसता तीने केलेले काम प्रेरणादायी तर आहेच परंतु त्यामागची तिची विचारप्रकिया आणि तिचं मुद्देसूद बोलणंही आम्हाला खूप काही शिकवून गेलं.
यानंतर वैभवदादाने आम्हाला त्याचा गावाहून पुण्यात आल्यानंतरचा प्रवास आणि अनुभव सांगितले.वैभवदादाने आजवर 83 शिबिरं केली आहेत.मेळघाट असो वा इतर कुठलं शिबिर त्यांचं नियोजन तो चोख पार पाडतो.आपला activist म्हणून प्रवास सांगताना त्याने एक खूप छान विचार आम्हाला दिला.तो म्हणजे-‘स्वतःबरोबरच इतरांनाही leader होण्याची संधी दया’-‘Goal is to create new leaders, not to be a leader’.

IMG-20170319-WA0046---STUDENTS GR PHOTO

(Participants who attended the workshop)

जेवणाचा break नंतर group activity session होतं ज्यात आम्ही विदयार्थ्यांचे 3 गट पाडले होते आणि त्यांना प्रत्येकी एक case study दिली होती.त्या अनुक्रमे ‘water management’, ‘women empowerment’ आणि ‘fight against superstitions’ अशा होत्या.
या चर्चेआधी आनंदने सगळ्यांना activist गिरीश कुलकर्णी (स्नेहालय) सरांचाvideo दाखवला. ज्यात गिरीशसरांनी त्यांच्या कामाविषयी अगदी मुद्देसूद माहिती दिली होती.

यांनंतरचा वेळ हा group discussionsचा होता.2017-03-20-22-21-56
प्रत्येक गटाला चर्चा करायला 20 मिनिटांचा वेळ दिला होता. त्यांच्या चर्चेतून मुद्दयांची जुळवाजुळव आणि इतरांना तो मुद्दा समजावून देण्याची क्रिया दिसली. यानंतर प्रत्येक गटाने दिलेल्या विषयावर सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणातून त्यांना असलेली विषयाची जाणीव,त्यांची विचारप्रक्रिया आणि त्यांचा त्यावर असलेला अभ्यास दिसून येत आला.
तस पाहता 20 मिनिटात केलेली चर्चा खरच अपुरी होती पण त्यातून प्रत्येकाच्या डोक्यात निर्माण झालेला विचार खूप महत्त्वाचा होता.
प्रत्येक गटाला त्यांच्या सादरीकरणावर frankly प्रश्न विचारण्यात आले. यातल्या काही प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली आणि ज्या प्रश्नांना त्यांच्याकडे उत्तरे नव्हती ; ती उत्तरे इतर गटांनी शोधण्यात मदत केली. अशाप्रकारे ही activity पार पाडली. खरतर इतक्या कमी वेळात एवढ्या मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करणं खरच अशक्य होत..पण यावर atleast विचार होणं महत्वाचं होत…

त्यानंतर आलेल्या feedbacks मधून आम्हाला संमिश्र प्रतिसाद मिळाले. बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना नवीन विषयाची माहिती मिळाली, काहींना discussion आवडलं होतं, तर काहींना “अजून activities हव्या होत्या” अस वाटत होतं.
या BE FRANK ला ठाण्याहून करणदादा आणि आनंद दादा सोबत धनश्री पेडणेकर ,शुभम सकपाळ हे ठाणेकर आणि संकेत वानरे(बोरिवली) हा मुंबईकर हि आला होता.
त्यामुळे कार्यक्रमाची रंजकता आणखी वाढली. जेवणही (उसाचा रसही) उत्तम होता, कारण त्याचं नियोजन अर्थातच विवेकने केलं होतं. एकंदर पुणे be frank खूप काही शिकवून गेला…. आणि activist होण्याची प्रेरणा देऊन गेला.
शेवटी सहज वाटलं की, “विद्यादान” स्वतः एक activist लोकांची संस्था आहे…..आणि आता दीक्षा , वैभव हि उभरते activist आहेत.
आणि या be frank नंतर पुणेकरही activist असतील… So, Be Frank…Be Activist..!!

Feedback by the participants

Feedback by the participants