VSM चा संपन्न झाला 11वा वर्धापनदिन सोहोळा
 माझ्यासाठी खरोखरच होता अनुभव विलक्षण वेगळा
 समाजात असतात अभागी जे वाहतात कैक उणी
 VSM च्या आधाराने पाहिले ते कसे मग घडतात गुणी
 थांबत नाहीत तिथेच होऊन फक्त स्वतःसाठी समाधानी
 वसा पुढे नेण्यास अभिमानी सरसावतात कृतज्ञतेनी
 कार्यक्रमाचे व्यवस्थापन पद्धतशीर नीटनेटके काटेकोर
 वातावरण उत्साह जल्लोषाचे परी पाळीत शिस्त संस्कार
 KP अहोरात्र झटत जोपासण्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता
 मिळतील सक्षम नागरिक का बनेल भारत महासत्ता 
 येथील भरगच्च नाविन्यपूर्ण उपक्रमांचे वाटले अप्रूप 
 मजसारखे श्रोते देखील झाले असतील हमखास तद्रूप
 संस्थापकाना दंडवत जी तुम्ही स्थापिली वीरळी संस्था
 धन्य ज्यांनी ह्या प्रवासात हातभार लावूनी दाखवली आस्था 
 प्रार्थना या संस्थेने अशीच करावी अनेक शिखरे पादाक्रांत 
 दुमदुमला जावा चांगुलपणाने अवघा आसमंत 
एक हितचिंतक