नमस्कार !

मंडळी, हे आवाहन नाही की विनंती ! तर प्रत्येक संववेदनशील मनाला घातलेली ही साद आहे !

ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळ, ही  समविचारी माणसांनी एकत्र येवून अकरा वर्षांपूर्वी उभारलेली संस्था आहे. यामध्ये आजच्या घडीला २८६ विद्यार्थी नर्सिंग, आयटीआय ते मेडीकल, इंजिनियरिंग अशा विविध विद्याशाखेत शिक्षण घेत आहेत तर २६०  कार्यकर्ते कार्यरत आहेत.

संस्था गेली दहा वर्ष समाजातील गरजू, गुणवंत आणि होतकरु विद्यार्थांना आर्थिक मदत करून थांबत नाही तर करिअर व व्यवसाय मार्गदर्शन, अभ्यासात कठीण वाटणाऱ्या विषयांचे मार्गदर्शन, बँकेतील भरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, नोकरीसाठी मुलाखतींचा सराव, विविध शिबिरांमधे सहभाग अशाप्रकारे सर्वांगीण मदत करून विद्यार्थाला शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ आणि आदर्श नागरिक म्हणून घडवत आहे.  गेल्या अकरा वर्षात ३५० हून अधिक विद्यार्थी  शिक्षण घेवून आज स्वत:च्या पायावर  उभे आहेत.

दूर खेड्यापाड्यात राहून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्था शहापूर येथे मुलांसाठी व ठाणे येथे  मुलांसाठी व मुलींसाठी होस्टेल चालवते ज्यात तिन्ही ठिकाणी मिळून ५० विद्यार्थी रहातात. संस्थेचा गेल्या वर्षीचा खर्च  २८६ विद्यार्थ्यांसाठी रू एक कोटी वीस लाख होता. या वर्षी विद्यार्थीसंख्या ३१५ वर जाईल  व खर्चाचे बजेट रू. एक कोटी पंचेचाळीस लाख असेल असा अंदाज आहे.

विद्यादान सहाय्यक मंडळ कोणतेही शासकीय अनुदान घेत नाही. त्यामुळे केवळ  तुमच्यासारख्या दातृत्ववान, हितचिंतक आदर्श नागरिकांच्या दानामधूनच ही रक्कम उभी राहू शकते. यासाठी विद्यादानाला आपल्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. मला खात्री आहे, विद्यादानच्या शैक्षणिक कार्यास आपण हातभार लावाल!

चला ! सगळे मिळवून देशाचे भाग्य घडवूया !

 

संपर्क साधा ९३२३९५९४३३/८२८६९१६०५७/८३५६०९३३४९